राम नाम महिमा
"राम" हा द्वयाक्षरी मंत्र आहे."रा"उच्चरणाने ओठ उघडले जातात शक्ती अंतरंगात प्रवेश करते."म" उच्चारणामुळे ओठ मिटले जातात ज्यामुळे या शक्तीचे बाहेर जाणे थांबते. शक्तीची प्रक्रिया अंतरंगात सुरु होते, साधकाची वाटचाल रामरुपाकडे सुरु होते.
विठ्ठल नाम महिमा
विठ्ठल हा त्र्यक्षरी गायत्रीमंत्र ('वि' व्युप्तत्ती वाचक 'ठ्ठ'स्थिती वाचक तर 'ल' लय वाचक). जगाची उत्पत्ती,स्थिती व लय करणारा तो विठ्ठल महामंत्र आहे.
शतकोटी नाम संकल्पना
मुळात वाल्मिकीने रचलेले रामचरित्र शतकोटी विस्तृत आहे. त्यातील एकेक अक्षर महापातकाचा नाश करणारे आहे असे म्ह्टले आहे.
चरीतं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम ।
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशम ।
याचा अर्थ शतकोटी अक्षरात गायिलेले रामचरित्र असा आहे.
अक्षर व अभंग याचा अर्थ जवळपास सारखाच आहे "नाश न पावणारं".
संत नामदेव, संत तुकाराम व संत तुकाविप्र यांनी 'वि' व्युप्तत्ती 'ठ्ठ'स्थिती 'ल'लय याचे तत्व नाश न पावणा-या १०० कोटी शब्दात सांगितले म्हणजेच शटकोटी विठ्ठलायन केले.