|
पंढरपुरात नगरप्रदक्षिणेच्या रस्त्यावर चंद्रभागा घाटानंतरच्या घाटावर,दादामहाराजांच्या मठाजवळ विप्रदत्त मंदिर आहे. यातील दत्तमूर्ती म्हणजे संत नामदेव,संत तुकाराम, व संत तुकाविप्र या तिघांच्या भक्तीचे प्रतिक आहे. दत्तप्रभूंच्या डाव्या हातास संत तुकाविप्रांचे शिष्य श्री बापुसाहेब विप्रा यांची समाधी आहे.
या मठाच्या स्थापनेचा संक्षिप्त इतिहास असा आहे: संत तुकाविप्र दर एकादशीला पंढरपुरास येत असत. त्यांची ती परंपरा त्यांच्या समाधीनंतर त्यांचे शिष्य बापुसाहेब विप्र चालवत होते.त्यांना आपल्या गुरुशिवाय पंढरपूर रिते वाटत होते. ते संत तुकाविप्रांना विनवीत असत "गुरुमहाराज आपला विरह सहन करणे अशक्य झाले आहे. पंढरीवैकुंठ नगरीमध्ये मी आपल्या वाचून जगूच शकत नाही".
संत तुकाविप्रांनी आपल्या शिष्याच्या स्वप्नात जाउन सांगितले "बापु! तुला ठावूक आहेच की मी दत्तस्वरुप झालो आहे,मलाही तुझ्य़ा प्रेमळ सहवासात पंढरीमध्ये राहणें निश्चितच आवडेल.तेव्हा तू माझे सतशिष्य सरदार रास्ते यांना मंदिरासाठी जागा माग,एक मंदिर बांध व कृष्णामाईत ज्या ठिकाणी तू शेष अभिरपुष्प टाकलेस त्या ठिकणी त्या ठिकाणी तुला दत्तस्वरुप झालेली माझी शाळीग्राम मूर्ती मिळेल.त्या मूर्तीची स्थापना तु पंढरीक्षेत्री कर."
श्री बापुनी तात्कळ सरदार रास्ते यांची भेट घेवुन जागा मिळवली एक भव्य मठ उभा केला.स्वप्नदृष्टांताप्रमाणॆ कृष्णामाईचे ठिकणी गुरुंचे स्मरण पूर्वक ध्यान करताच शाळीग्राम मूर्ती मिळाली.तिची रथातून पंढरीत विधीवत आणून स्थापना केली.या मूर्तिच्या स्थापनेसाठी समस्त बडवे मंडळींनी प्रचंड विरोध केला होता पण प्रत्यक्ष पांडुरंगाने समस्त बडव्यांना स्वप्न दृष्टांत देउन विरोध न करण्याबाबत सांगितले.तसेच पाडुरंगाने स्वतः पौरोहित्य करुन या अद्वितीय मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार असल्याचे सांगितले.समस्त बडव्यांनीही पाडुरंग सेवेबरोबरच या दत्तात्रयाची भक्ती करावे असे सांगीतले.
शके १७५२ ची आषाढ यात्रा संपली,महाद्वार काला करुन आषाढ वैद्य द्वितीयेस दत्त प्रभुंच्या चरणापाशी बसून एकटक मूर्तीकडे पहात पहात बापु विप्रांनी देहावरील ममत्व सोडले,याच वेळी श्री दत्तप्रभुंच्या दर्शनार्थ व बापुविप्रांना कुशीत घेण्यासाठी चंद्रभागा दत्तप्रभूंच्या चरण कमलापर्यंत आली होती.
|