|
संत
ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम,
संत रामदास इ. संतांच्या उपलब्ध प्रत्येक साहित्यापेक्षा
संत तुकाविप्रांचे साहित्य खूप जास्त आहे. (काही
त्यांच्या स्वहस्तलिखित स्वरुपात तर काही पुर्नलिखाण
केलेले) उदाहरणार्थ - अभंग गीता (शके १७०४ ते १७१०),
अभंगात्मक तत्वमसि, हरिपाठाचे अभंग, इ. स्फुट अभंग.
एवढ्या प्रमाणात साहित्याची निर्मिती झालेली असूनही हे साहित्य आज २०० वर्षे झाली तरी आपण समाजापर्यंत पोहोचू शकत नाही याची खंत सतत बोचते आहे.हे कार्य प्रत्येकापर्यंत जावे या हेतूने आम्ही www.tukavipra.org ही website निर्माण केली आहे.
संत तुकाविप्रांचे आम्हाजवळ असलेले सर्व साहित्य हे आम्ही समाजाचे देणे लागतो आहोत. हा अध्यात्मिक साठा जो संत तुकाविप्रांनी मानवजन्माच्या कल्याणासाठी निर्माण केला आहे. हा अमृत कलश समाजास उपलब्ध व्हावा या सदहेतूने संत तुकाविप्रांच्या साहित्यास समाजाभिमुख करण्यासाठी आपले सर्वांचे सहकार्य गृहित धरले आहे. |