|| दत्त || जनार्दन || एकनाथ || विप्रस्वामी || सतगुरुनाथ ||
  • परिचय
  • अवतार परंपरा
  • तुकाविप्र चरित्र
  • तुकाविप्र कथा
    Saint TukaVipra Temple Trust invites business proposals for publishing / marketing literature of Saint TukaVipra. To have overview of literature
    click here.
    Click Here To Send Business Proposal About Publishing Literature Of Saint Tukavipra










































    संत तुकाविप्र- एक दृष्टिक्षेप


    आम्ही सखे देवाजीचे । येका विठ्ठ्ल बीजाचे ॥
    जन्म पाचही जहाले । बीज नाही पालटले ।
    येकबीज आजीवरी । जन्म याच क्षितीवरी ।
    दंड्कारण्य देशात । याची कलीयुगा आत ।
    शकामाजी शालीवान । जन्म पाच जाले धन्य ।
    तुकाविप्र पाचवीया । जन्म जाली गुरु दया ॥


    || परिचय ||

    आईचे नाव सौ. चिमणाबाई
    वडिलांचे नाव भगवंत गंगाधर विपट
    आजोबांचे नाव गंगाधर पिलाजी विपट
    वतन(मुळ गाव) श्रीरामनगरी (रहिमतपुर),जि.सातारा
    जन्मस्थळ अंजनवती. ता. जि.बीड
    जन्मतीथी श्रावण कृ. ८ शके १६५०
    समाधी स्थळ अंजनवती.ता.जि.बीड
    समाधी अंजनवती. पौ.कृ.१४ शके १७१४
    नाममुद्रा तुकाविप्र (आपले व गुरुचे नाव घेऊन)

    || अवतार परंपरा ||

    कृतायुगी प्रल्हाद जाहाला तेथे नारदे उपदेशीला ।
    भागवती प्रसिध्द हे लिला । वर्णिला भला स्वानुभव ॥
    त्रेती वालीचा तो कुमर । अंगद नामे महावीर ।
    मग बोधीले साचार । वायूपूत्रे श्री मारुति ॥
    द्वापारी तो उद्धव जाहाला । यादव वौंषी जन्मला ।
    सर्वोत्तमे अनुग्रह केला । वर्णिले तयाला व्यासानी ॥
    कलिमध्ये तोची उद्धव । भक्त जाहला नामदेव
    जयासंगे देवाधीदेव जेविले भाव पाहुनी ॥
    विसोबा खेचर हा संत । जया लागी प्रबोधीत ।
    भजनरंगी रंगले चित्त । धन्य भक्त ते नामदेव ॥
    पुढे नामयाचा जाहाला तुका । हे तो प्रसिद्ध आहे लोका ।
    ज्याचे वैराग्य पाहता देखा। सनकादीका विस्मय मनी ॥
    मग तुका म्हणे देवेंद्रास । अवतार घेणे आहे आम्हास ।
    तुजही करु उपदेश । राहीले विशेष करणे ते।
    ऐसे सुरेशा सांगून । भूतळासी निघाले जाण ।
    तेंव्हा पवित्र आपुली खुण । दिधली पूर्ण देवराजे ॥
    विलोमरेफ संगती विप्रत्व आले वज्त्राप्रती ।
    मग तुकाविप्र नामे जन्म धरिती । अवतार क्षिती श्री तुकोबा ॥
    अवतार
    युग
    भक्त प्रल्हाद
    त्रेतायुग
    अंगद
    सत्ययुग
    उद्धव
    व्दापार युग
    संत नामदेव
    कलीयुग
    संत तुकाराम
    कलीयुग
    संत तुकाविप्र
    कलीयुग

     

    © सर्व हक्क सुरक्षित Tukavipra.org 2006. Marathi Font Problem?
    Website Designed and Developed by ATMTGroup , India